• Home
  • क्राईम
  • महिलेच्या प्रसंगावधानामुळे तरुणीवरील हल्ल्याचा प्रयत्न फसला…
Image

महिलेच्या प्रसंगावधानामुळे तरुणीवरील हल्ल्याचा प्रयत्न फसला…

प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीवर कोयता उगारण्यात आल्याची घटना शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात घडली. तेथून निघालेल्या एका महिलेने आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरुन आरोपी पसार झाला. याप्रकरणी रात्री उशीरा एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

सुभाषनगर परिसरातून दुपारी तरुणी आणि तिची मैत्रीण निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एकाने तरुणीवर कोयता उगारला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर तरुण दुचाकीवरुन पसार झाला. सुदैवाने या घटनेत तरुणीला दुखापत झाली नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तरुणीने पोलिसांकडे अद्याप तक्रार दिली नाही.

दरम्यान, तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून पसार झालेल्या एकाला रात्री उशीरा तळजाई टेकडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. महेश सिद्धप्पा भंडारी (वय २२, रा. जनता वसाहत) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. भंडारीसह एका साथीदाराविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महाविद्यालयीन तरुणी त्याच्या ओळखीची आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीला धमकावल्याचे उघडकीस आले आहे. सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलीस चौकीजवळ एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026