• Home
  • ताज्या बातम्या
  • बारामती तालुक्यातील प्रशालेंमध्ये चांगले शिक्षण दिले जात नाही का ? विद्यार्थ्यांना का पैसे घालवून लावावे लागतात एक्स्ट्रा क्लासेस” बारामती गटशिक्षण अधिकारी यांनी यावरती गांभीर्याने लक्ष्य द्यावे नागरिकांची मागणी .
Image

बारामती तालुक्यातील प्रशालेंमध्ये चांगले शिक्षण दिले जात नाही का ? विद्यार्थ्यांना का पैसे घालवून लावावे लागतात एक्स्ट्रा क्लासेस” बारामती गटशिक्षण अधिकारी यांनी यावरती गांभीर्याने लक्ष्य द्यावे नागरिकांची मागणी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

भविष्यात शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शाळा/कॉलेज असेल तरच विद्यार्थ्यांचे पुढचे भविष्य सुधरते व भविष्यात आपल्या पाल्याला चांगले शिक्षण घेऊन त्याला चांगले ज्ञान मिळवून भविष्यात काहीतरी करता येईल यामुळे पालकांनी शिक्षणाला पहिले प्राधान्य दिले आहे. यामध्ये आता विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा क्लास लावण्याची गरज का पडते ? असा प्रश्न नागरिक व पालकांमध्ये पडला आहे .

प्रशालेमध्ये चांगले शिक्षण दिले जात नाही का? का प्रशालेमध्ये शिकवलेच जात नाही ? यावर बारामती तालुका गटशिक्षण अधिकारी यांनी बारामती तालुक्यातील सर्व प्रशालॆऺवरती लक्ष्य देऊन शाळा / कॉलेज मधील शिक्षण यामध्ये कशी सुधारना येईल याकडे लक्ष्य दिले पाहिजे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे .

भारत हा संपूर्ण डिजिटल इंडिया म्हणून ओळखला जातो तरी देखील काही शाळा , कॉलेजमध्ये डिजिटल सुविधा व डिजिटल पद्धतीनं शिकवत नसल्याचे निदर्शनास येत आहे ?. शाळा/कॉलेज म्हणजे संपूर्ण प्रात्यक्षिक युग झालेले आहे. हे प्रात्यक्षिक प्रशालेमध्ये शिकवून व करून दाखवले जाते का? का शिक्षक आपली शिक्षक असल्याची भूमिका फक्त पुस्तक वाचून निभावतात? शिक्षकांचे शिकवण शाळा कॉलेजमध्ये व्यवस्थित असेल तर विद्यार्थ्यांना बाहेर एक्स्ट्रा क्लासेस लावण्याची गरज पडती का व कशासाठी? अश्या प्रश्नांची चर्चा पालक व ग्रामस्थ यांच्यामध्ये होत असताना सर्वत्र दिसत आहे .

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून बारामती गटशिक्षणाधिकारी यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

Releated Posts

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन पुणे, दि. २९: “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ,…

ByBymnewsmarathi May 29, 2026

श्री क्षेत्र वीर येथे अभाविप बारामती आयोजित “सह्यादी स्पर्श” समर कॅम्प उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बारामती जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सह्यादी स्पर्श” हा तीन दिवसीय समर…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे : बारामती मुस्लिम समाजाची मागणी

प्रतिनिधी – बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक २५ मे रोजी प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच बारामती…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती तालुक्यात गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; रक्तमिश्रित साहित्य जप्त

प्रतिनिधी. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जनावरांच्या अवैध कत्तलीप्रकरणी तीन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या…

ByBymnewsmarathi May 20, 2026