• Home
  • ताज्या बातम्या
  • सिनेअभिनेत्री सिमरन खेडकर यांची श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयास सदिच्छा भेट.
Image

सिनेअभिनेत्री सिमरन खेडकर यांची श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयास सदिच्छा भेट.

श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत येथे आज वार शुक्रवार दि. १६/०१/२०२५ रोजी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्री मा. सिमरन खेडकर यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे संपूर्ण शालेय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी अभिनेत्री सिमरन खेडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आणि आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सिमरन खेडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी त्यांच्या बालपणीच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेतील अभ्यासाबरोबरच तुमच्यामध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव द्या असे त्या म्हणाल्या . कठोर परिश्रम आणि शिस्त शालेय जीवनात अतिशय महत्त्वाची आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी वाचनाचे महत्त्व सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मा.श्री. भीमराव बनसोडे सर उपस्थित होते. या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीश भैय्या काकडे देशमुख, संस्थेच्या उपाध्यक्षा मा. सौ. सुप्रियाताई पाटील, संस्थेचे मानद सचिव मा. श्री. मदनराव काकडे देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

Releated Posts

निंबुत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून मदनराव काकडे मैदानात उतरण्याची शक्यता.

प्रतिनिधी. नींबूत (ता. बारामती) येथील पंचायत समिती गणातून आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मदनराव काकडे हे उमेदवारीच्या शर्यतीत…

ByBymnewsmarathi Jan 16, 2026

निंबुत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून मदनराव काकडे यांच्या नावाची जोरदार चर्चा.

प्रतिनिधी. नींबूत (ता. बारामती) येथील पंचायत समिती गणातून आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मदनराव काकडे हे उमेदवारीच्या शर्यतीत…

ByBymnewsmarathi Jan 16, 2026

निंबुत–कांबळेश्वर जिल्हा परिषद गटातून प्रियराज (अभिजीत )सतीशराव काकडे मैदानात?

प्रतिनिधी निंबुत–कांबळेश्वर (ता. बारामती) जिल्हा परिषद गटातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अभिजीत सतीशराव काकडे हे मैदानात उतरण्याच्या तयारीत…

ByBymnewsmarathi Jan 16, 2026

शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न गुन्हा – राज्य निवडणूक आयोगाचा इशारा.

प्रतिनिधी. मतदान प्रक्रियेची शुचिता आणि पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.…

ByBymnewsmarathi Jan 15, 2026