• Home
  • इतर
  • स्पा सेंटरवर छापा टाकुन ०३ परदेशी व १ भारतीय पिडीत मुलींची सुटका
Image

स्पा सेंटरवर छापा टाकुन ०३ परदेशी व १ भारतीय पिडीत मुलींची सुटका

प्रतिनिधी

लाना स्पर्श स्पा, गुलमोहर अर्चिड बिल्डींग, पहिला मजला, प्लॅट नं ०६. लुलानगर, कोंढवा पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण ०४ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. सदर स्पा मालक व मॅनेजर यांचे विरूद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं २० / २०२३ मादवि ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३.४५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी मॅनेजर व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता कोंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे….मा. सदरची कारवाई श्री. रितेश कुमार मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. अमोल झेंडे मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण, या पथकाने यशस्वी केली आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025