सोमेश्वरनगर (वा)
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यालयातील शिक्षक हेमंत गडकरी यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही प्रेरक प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बाळू बालगुडे, सोमनाथ डगळे, महेंद्र कुतवळ, नूतन काळाणे, लीना जराड, शुभांगी जगताप उपस्थित होते.
अब्दुल कलाम यांना विद्यार्थ्यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या भोवती बसत वाचन करून तसेच वाचनाचा निश्चय करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक संतोष जेधे यांनी केले.
