प्रतिनिधी
गुरुवार दिनांक 15 /10 /2026 रोजी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनानिमित्त संस्थेचे संचालक मा .श्री.भीमराव बनसोडे सर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये मा . श्री बाबालालजी काकडे त्याचप्रमाणे डॉ . ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या कार्यावर प्रकाश टाकला .
विद्यालयातील विद्यार्थी शिवतेज धुमाळ इयत्ता 6वी , आदेश भंडलकर इयत्ता 10वी , हर्षवर्धन जगताप इयत्ता 10 वी या विद्यार्थ्यांनी डॉ . एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय करून दिला .संस्थेचे अध्यक्ष मा . सतीशभैय्या काकडे दे. उपाध्यक्षा मा.सौ. सुप्रियाताई पाटील,मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.यांनीही या कार्यक्रमाचे कौतुक केले .
