प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे या कारखान्याच्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्व साधारण सभा दि.२९/०९/२०२१ रोजी सभासदांच्या एक शेअर्सची किमान किंमत १०००० /- रूपयांवरून १५०००/- रू. करून त्याची वसुली उस बिलातून दोन समान हप्त्यांमध्ये करण्यात यावी असा ठराव झालेला आहे. असे असताना चेअरमन यांना कारखान्यात आर्थिक चणचण भासत असल्याने सभासदांचा प्रति एकर १ शेअर्स (भाग) व पुढील जादा क्षेत्रा प्रमाणे होणारे शेअर्स (भाग) कपात करण्यासाठी संचालक मंडळाची दि.२६/०८/२०२२ रोजी सभा बोलावुन संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक १० ने जादा शेअर्स एकाच टप्यात कपात करण्याचा जुलमी कुटील डाव चेअरमन यांनी आखला आहे. व सभासदांना वाढीव शेअर्सला साखर देण्याचे वार्षिक सभेमध्ये लालुच दाखविले व सभासद त्याला बळी पडले.
मध्यंतरी संस्थापक सभासदांचे जे अतिरीक्त शेअर्स होते त्यांची साखर बंद केली त्यावेळी कारखान्याला आर्थिक तोषिश बसत आहे, कारखान्याला आयकर विभागाची नोटीस आलेली आहे व साखर आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागेल असे कारण पुढे करून त्यांची साखर बंद केली होती. आता चेअरमन म्हणत आहेत की वाढीव शेअर्स प्रमाणे सभासदांना साखर दिली जाईल मग आता कारखान्याला आर्थिक तोषिश बसणार नाही का?, कारखान्याला आयकर विभागाची नोटीस येणार नाही का? व साखर आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागणार नाही का? याचे उत्तर चेअरमन यांनी द्यावे. तसेच चेअरमन यांनी दर वेळी स्वःताच्या सोयी प्रमाणे राजकारण करून सभासदांना आर्थिक तोषिश देवुन स्वःताचा स्वार्थ साधु नये.
सभासदांच्या कारखान्यास गाळप होणाऱ्या उसाच्या F.R.P रक्कमेतून सोसायटीचे कर्ज वसुल होण्याआधीच उस बिलातून मोठ्या प्रमाणात धारण केलेल्या क्षेत्रा प्रमाणे शेअर्स रक्कम एक रक्कमी वसुल करून घेतली जात आहे हे योग्य नाही हा सभासदांवर अन्याय आहे. कारखान्याने शेअर्स कपातीचे समान तीन हप्ते करण्याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास कृती समितीस कारखान्यावर मोर्चा काढावा लागेल व वेळ प्रसंगी काटा बंद आंदोलन करावे लागेल व होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी चेअरमन व संचालक मंडळाची राहिल. तरी ज्या सभासदांची उस बिलातुन एकरक्कमी शेअर्स कपात केली आहे. त्यांनी कारखान्याकडे अर्ज करून तीन टप्यात वाढीव शेअर्स रक्कम कपात करून घेणे संबंधी सुचना करावी. तसेच ज्या सभासदांचे वाढीव शेअर्स कारखान्याने कपात करून घेतले आहेत त्यांना कारखान्याने कपात केलेल्या महिन्यापासुन शेअर्स प्रमाणे महिन्याला साखर वाटप सुरू करावे. तसेच कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे का? याबाबत साशंकता आहे. कारण भाग भांडवल नावाखाली शेअर्स मधुन कोट्यावधी रूपये खेळते भांडवल गोळा करून ते स्वःनिधी म्हणुन वापरायचे आहे का? बांधकामे काढुन खडी, वाळु, सिमेंट व स्टील साठी खर्च करायचे हे संचालक मंडळाने विचारांती ठरवावे असे आवाहन शेतकरी कृती समिती करीत आहे.
तरी कारखान्याने सभासदांच्या उस बिलातुन वाढीव क्षेत्रा प्रमाणे होणारी शेअर्स रक्कम एकरक्कमी कपात न करता ती तीन टप्यांमध्ये कपात करावी. तसेच ज्या सभासदांनी वाढीव शेअर्स घेतलेले आहेत त्यांना शेअर्स कपात केलेल्या महिन्यापासुन वाढीव साखर वाटप सुरू करावे. अन्यथा कृती समिती कारखान्याच्या जुलूमी शेअर्स वसुली विरोधात आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही. याची नोंद चेअरमन व संचालक मंडळाने घ्यावी.
F.R.P वरील व्याज देण्याचे चेअरमन यांना उशिरा सुचलेले शहाणपण !
व्याज देणे हे भुषण नसुन कमी पणा आहे !
मागील गळीत हंगामातील F. R.P रक्कम उशिरा दिल्याने शेतकरी कृती समितीने कारखान्यास व साखर आयुक्त कार्यालयास दि.१४/१२/२०२१ रोजी F.R.P उशिरा दिल्याने त्यावरील व्याज सभासदांना मिळावे म्हणुन पत्र व्यवहार केलेला होता. परंतु कारखान्याचे चेअरमन वर्तमान पत्रामधुन सभासदांना पहिल्यांदाच F.R.P वरील व्याज देणारा जिल्ह्यातील पहिलाच कारखाना असल्याच्या फुशारक्या मारत आहेत. परंतु चेअरमन यांना माझे सांगणे आहे की कृती समितीने २००९ साली उशिरा दिलेल्या F.R.P रक्कमेवरील व्याज कारखान्याकडुन वसुल केले होते हे आपण विसलेले दिसता ।
तसेच चालू गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये सुध्दा कारखान्याने सभासदांना उशिरा F. R.P दिल्याने त्यावरील होणारे व्याज मिळणे कामी दि.०१/ १२ / २०२२ रोजी कारखान्यास व साखर आयुक्त कार्यालयास पत्र व्यवहार केलेला आहे तरी चालु वर्षीच्या F.R.P वरील व्याज सुध्दा कृती समिती कारखान्याकडुन वसुल करणार आहे याची नोंद चेअरमन यांनी घ्यावी. कृती समिती सभासदांच्या न्याय हक्कांसाठी लढा देत आलेली आहे व पुढे देखील कृती समिती लढा देत राहिल.