• Home
  • इतर
  • सोमेश्वरनगर करंजेपूल शेंडकरवाडी येथील कॅनॉल वरील पूल ग्रामस्थांसाठी की, ठेकेदाराचे हितसंबंध जोपासण्यासाठी? नागरिकांमध्ये संभ्रम.
Image

सोमेश्वरनगर करंजेपूल शेंडकरवाडी येथील कॅनॉल वरील पूल ग्रामस्थांसाठी की, ठेकेदाराचे हितसंबंध जोपासण्यासाठी? नागरिकांमध्ये संभ्रम.

संपादक मधुकर बनसोडे.

निरा ङावा कालव्यावर चाललेले ब्रिजचे काम शेंङकरवाङी ग्रामस्थ यांनी बंद पाडून आठवङा झाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी ग्रामस्थ मंङळीं बरोबर सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी लोकांबरोबर चर्चा घडवून आणली.परंतू पूलाबाबतीत काहीही तोडगा निघाला नाही.आदरणीय संभाजीनाना यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ किंवा आदरणीय अजितदादा पवारसो यांना समक्ष भेटून त्यांना माहीती देऊ परंतू आठ दिवस झाले.काहीही मार्ग किंवा शेंङकरवाङी ग्रामस्थ यांना माहीती मिळाली नाही.तरी शेंङकरवाङी ग्रामस्थ यांना दळणवळण करण्यासाठी अत्यंत कठीण अवस्था होऊन बसली आहे हा कॅनॉल वरील पूल नक्की नागरिकांच्या सुख सोयीसाठी बांधला आहे की ठेकेदाराचे हितसंबंध जोपासून अधिकारी वर्गास कमिशन मिळण्यासाठी बांधला आहे? अशी देखील चर्चा परिसरामधील नागरिकांमधून होत आहे?

.कॅनाॅल पास करायचा म्हटले तरी दोन किलोमीटर वरून वळसा घालून यावे लागत आहे.जनावरांना चारा किंवा शेतीची मशागत करायला दूरवरून जावे लागत आहे.तरी शेंङकरवाङी ग्रामस्थ पुलाची उंची कमी व्हावी या विषयावर ठाम आहेत.आदरणीय मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो यांनी शेंङकरवाङीतील बांधकाम चाललेल्या पुलाला समक्ष भेट द्यावी.व पुलाची ङिझाईन तपासावी आशी मागणी शेंङकरवाङीतील ग्रामस्थ करत आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याचा हा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.कारण नसताना अधिकचा निधी मंजूर करून ठेकेदार संभाळण्याचा उधोग कोण करतयं हे देखील दादांना समजले पाहीजे.आशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शिवाजी शेंङकर प्रदिप शेंङकर महेश शेंङकर किरण शेङकर निखिलभैया शेंङकर राहूल शेंङकर दादासाहेब चौधरी सचिन चोरगे सुरेश शेंङकर व ग्रामस्थ मंङळींनी केली आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025