दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी चंदन अशोक गव्हाळे याला महेश सुनील खंडागळे यांनी चेष्टा मस्करीतून फायटरने मारहाण केल्या बाबतचा गुन्हा बारामती शहर पोलीस स्टेशनला दाखल होता त्यामध्ये कलम 326 लावण्यात आलेले होते आरोपी महेश याला पोलिसांनी अटक करून पंधरा दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवलेला होता
चंदन गव्हाळे याचे पोलीस कारवाई होऊन सुद्धा समाधान झाले नाही त्याला स्वतःच महेश याला शासन करायचे होती कारण त्याच्या वर्चस्वाला कुठेतरी धक्का लागला होता असा त्याचा समज होता
आणि महेश जेलमधून सुटून आल्यानंतर भीतीपोटी घरी येत नव्हता तो तीन महिन्यानंतर दिनांक २ मार्च रोजी घरी आला सायंकाळी तो घरामध्ये असताना त्याच्यासोबत त्याची बहीण कोमल मिसाळ त्याचा दाजी राहुल मिसाळ वडील सुनील खंडागळे आई अशा खंडागळे बहिणीची दोन लहान मुली भाऊ विनायक हे सर्व घरात असताना चंदन अशोक गव्हाळे तन्मय काकडे अक्षय वाघमोडे आकाश वाघमोडे सर्व राहणार आंबेडकर वसाहत आरती शंकर गव्हाळे व शंकर अशोक गव्हाळे यांनी त्यांच्या घरावर हत्यारांशी दगड विटा घेऊन हल्ला केला महेश खंडागळे च्या नातेवाईकांनी त्याला घरामध्ये लपून ठेवला त्यावेळेस चंदन गव्हाळे तन्मय काकडे यांनी धारदार हत्यारांनी महेश चे वडील सुनील खंडागळे वय पन्नास वर्ष यांच्यावर जीवघेणा हल्ला केला त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली तसेच त्याच्या आईच्या आशा खंडागळे चे सुद्धा डोक्यात वार करण्यात आला तसेच महेशचा दाजी राहुल मिसाळ याच्या सुद्धा डोक्यात मार लागला सुनील खंडागळे यांना गंभीर दुखापत डोक्यात नाजूक ठिकाणी झाल्याने ते त्या ठिकाणी कोसळले पोलीस तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचली सुनील खंडागळे व इतर सर्व जखमींना पोलीस गाडीत घालून महिला हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी सुनील खंडागळे यांची तब्येत नाजूक असल्याने त्यांना ससून रुग्णालयात पाठवले आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आशा खंडागळे व राहुल मिसाळ यांना उपचार करून घरी सोडण्यात आलेले आहे
याबाबत कोमल राहुल मिसाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याविरुद्ध वरील सर्वांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने भारतीय दंड विधान संहिता कलम 307 143 147 149 120 ब भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे
या गुन्ह्यात पोलिसांनी चंदन अशोक गव्हाळे तन्मय काकडे अक्षय वाघमोडे आकाश वाघमोडे यांना अटक केलेली आहे
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदवून इतर आरोपींच्या वर सुद्धा कारवाई करणार आहे. यातील जखमी सुनील खंडागळे यांची शस्त्रक्रिया ससून हॉस्पिटल या ठिकाणी होणार आहे. सध्या ते जबाब देण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. सदर गुन्ह्याचा सखोल तपास माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी करण्याचे आदेश दिलेले आहेत
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे सहाय्यक पोलीस फौजदार सातपुते पोलीस हवालदार कल्याण खांडेकर पोलीस नाईक दशरथ कोळेकर जामदार राणे हे करत आहेत.