मुख्य मजकुरावर जा
Sunday, 20 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 10 October 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मुंबई पोलिसांनी 4682 बनावट प्रतिज्ञापत्रे जप्त केली आहेत, शिंदे गटाचा आरोप

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 10, 2022 1 मिनिट वाचन 8,525 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

संपादक- मधुकर बनसोडे

प्रतिज्ञापत्रात ज्यांची नावे आहेत ते नोटरीसमोर हजर नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या सर्वांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे

निवडणूक आयोगाने चिन्हावर बंदी घातल्यानंतर उद्धव गटाने खोटी शपथपत्रे तयार केल्याचा आरोप शिंदे गटाने रविवारी केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाच्या समर्थनार्थ तयार करण्यात आलेली ४६८२ प्रतिज्ञापत्रे मुंबई पोलिसांनी जप्त केली आहेत.याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तींवर फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्या लोकांची नावे शपथपत्रात आहेत, ते नोटरी करताना उपस्थित नव्हते. त्यामुळे या सर्वांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.दरम्यान, ही बनावट प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर सादर करण्यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे आभारही मानले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख