*प्रतिनिधी मुढाळे- विजय गायकवाड*
बारामती तालुक्यातील मुढाळे गाव येथे मिळालेल्या माहितीनुसार *15 व्या वित्तआयोगा* मार्फत शुद्ध पाणी प्रकल्प उभारण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी योजना सर्वत्र चालू आहे. मुढाळे गाव येथील हा शुद्ध पाणी प्रकल्प फक्त नावापुरता उभा करण्यात आलेला आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या योजनेचा कोणालाही लाभ घेता येत नाही. हा प्रकल्प तयार होऊन दोन महिने झाले. पण तरीसुद्धा आता तो चालू झाल्यापासून नादुरुस्तच आहे व त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. हा प्रकल्प सुरू होऊन दोन महिने झाले पण नागरिकांचे म्हणणे आहे याचा वापर कोणालाही करता आला नाही. हा प्रकल्प बंदच आहे .फक्त नावापुरता चालू केलेला आहे. याचा नागरिकांना काहीही फायदा झाला नाही.पाच रुपयांमध्ये शुद्ध वीस लिटर पाणी या योजने;अंतर्गत नागरिकांना उपलब्ध करून दिले जाते.परंतु या झालेल्या वॉटर प्लांट चा फायदा नागरिकांना घेता येत नसून हा बंदच आहे. दुरुस्तीचे काम होत नाही.त्यातच आता उष्णता वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा भेडसावत आहे. त्यातच गावामध्ये झालेला हा शुद्ध पाणी प्रकल्प याचाही त्यांना फायदा घेता येत नाही .त्यामुळे नागरिकांचे एवढेच म्हणणे आहे हा फक्त नावापुरता शुद्ध पाणी प्रकल्प आहे का? का फक्त निधी लाटण्यापुरताच हा वॉटर प्लांट उभा करण्यात आला आहे का?
नक्की हा वॉटर प्लांट कशासाठी उभा करण्यात आला आहे. ही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे .तरी नागरिकांना लवकरात लवकर हा शुद्ध पाणी प्रकल्प दुरुस्त करून भेटावा व त्याचा लाभ घेता येईल ही नागरिकांची विनंती आहे. असेच त्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. तसेच दूषित पाण्यामुळे असंख्य आजार होत आहेत. कॉलरा ,गॅस्ट्रो, कावीळ अशा अनेक आजारांपासून नागरिकांचे संरक्षण होईल. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली असता दोन दिवसांमध्ये चालू होईल. तसेच विविध कारणे मिळत आहेत. अशी वारंवार त्यांना उत्तर मिळत आहेत. परंतु या प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम होत नाही प्रकल्प बंदच आहे. त्याची दक्षता कोण घेणार? हा नागरिकांना प्रश्न पडला आहे. त्यांना शुद्ध पाणी मिळणारच नाही का हा पण त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे.