मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 22 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे महापुरुषांची संयूक्त जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन .

mnewsmarathi 17 Apr 2023 1 मिनिट वाचन 8,961 वाचन

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर तालुका बारामती येथे सत्यशोधक ओबीसी महासंघ यांच्या आयोजित महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त मंगळवार दि.१८/४/२०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्राअंगणात व्याख्यानाचे आयोजण केले आहे .सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवा निमित्तसत्यशोधक ओबीसी महासंघ.


मराठा सेवासंघ. छत्रपती क्रांती सेना. मौर्य क्रांती संघ यांच्या संयुक्त विध्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युनिटी ऑफ मूलनिवासी या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारत भर दहा हजार कार्यकमाचे आयोजन केले आहे .त्याचा च भाग म्हणून हा विषय चर्चेला घेतला जाणार आहे .

यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन बिगबॉस व मुलगी झाली हो या कार्यक्रमाचे फेम सिने अभिनेता किरणजी माने , सचिव पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड शिवश्री विनोदजी जगताप व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कमलाकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष युनिटी ऑफ मूलनिवासी , व प्रमुख वक्ते म्हनुन मुनीर भाई तांबोळी ( मानव हक्क कार्यकर्ते ) यांची उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाचा विषय तथाकथेत स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील ओबीसी तथा बहुसंख्य समाज गुलामगिरीत आहे .कारण मनुवाद शासक वर्ग ओबीसी समाजाची जाती निहाय जनगणना करत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देशाच्या शासन प्रशासनामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळत नाही .हे शासक वर्गाचे षडयंत्र आहे .

या विषयावर प्रमुख वक्ते आपले वक्तव्य मांडणार आहेत.अशी माहीती बामसेफ चे प्रचारक डॉ प्रशांत साळवे यांनी दिली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi