प्रतिनिधी.
याबाबत सविस्तर बातमी अशी की दिनांक २७/०४/२०२३ रोजी मा वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री लकडे सो व क्राईम पोलीस निरीक्षक श्री काकडे सो यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक संदीप जोरे व स्टाफ असे मुंढवा पोलीस दाखल मोबाईल चोरीच्या गुन्हा रजि नं १३९ / २३ भा द वी ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना मुंढवा तपास पथकातील पोलीस हवालदार ७३२ दिनेश राने व
पोलीस हवालदार ४१५७ महेश पाठक यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम मुंढवा रेल्वे बीज खाली चोरीचे मोबाईल विक्रीसाठी रिक्षातुन घेवुन येणार आहेत. सदरची बातमीची खात्री करुन सदरची बातमी मुंढवा वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे सो यांना कळवुन त्यांनी तात्काळ पुढील कारवाईचे आदेश दिले. मुंढवा तपास पथक अधिकारी श्री संदीप जोरे सपोनी व स्टाफ यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे हर्षल मनोज पांचाळ वय २१ वर्षे व त्याचा साथिदार नामे इम्रान ताज शेख वय २२ वर्षे दोघे रा सर्वोदय कॉलनी मुंढवा यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे असणारे रिक्षाचे समोरील डीकीमध्ये वेगवेगळया कंपनीचे एकुण १,७०,०००/- रु किमतीचे एकूण १५ मोबाइल मिळुन आले. सदर मोबाईलमध्ये मुढवा पोलीस ठाणे गुर नं १३९ / २०२३ मा द वी ३७९ मधिल चोरीस गेलेला मोबाईल मिळुन आला. सदर मोबाईल आरोपी यांनी मुंढवा चौकातुन शेल पंपाजवळील बस स्टॉपवरुन चोरल्याचे सांगितले. त्यांचेकडे मिळुन आलेल्या इतर मोबाईल बाबत चौकशी केली असता त्यांनी ते केशवनगर बस स्टॉप मुंढवा मधिल बस स्टॉप तसेच चंदननगर मधिल व हडपसर मधिल पीएमटी बस स्टॉप वरुन चोरल्याचे सांगितले आहे. बाकी जप्त करण्यात आलेले १५ मोबाईल चे तांत्रिक विश्लेषण करुन पुढील कारवाईची तजवीज ठेवलेली आहे. आरोपींकडे सखोल चौकशी चालु असुन अधिक मोबाईल मिळण्याची शक्यता आहे.
सदरची कामगीरी मा. श्री रीतेशकुमार साो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णीक सो, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्री विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्री बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे श्री प्रदिप काकडे पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा तपास पथकाचे अधिकारी संदिप जोरे, सहा. पोलीस निरीक्षक, व तपास पथकातील नेमणुकीस असणारे पोहवा / ७३२ दिनेश राणे पोहवा / ४१०२ भांदुर्गे, पोहवा / ४६३८ वैभव मोरे व पोहवा / ४१५७ महेश पाठक पोना ६७०४ राहुल मोरे पोशी / ४४४१ स्वप्नील रासकर, पोशी ८१४३ सचिन पाटील यांनी केली आहे.