• Home
  • इतर
  • पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- प्रांताधिकारी वैभव नावडकर*
Image

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- प्रांताधिकारी वैभव नावडकर*

प्रतिनिधी.

बारामती दि. १२: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालख्या बारामती तालुक्यातून मार्गस्थ होतात. हा आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या.

प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, माळेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी स्मीता काळे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, परीविक्षाधीन नायब तहसिलदार तुषार गुंजवटे आदी उपस्थित होते.

श्री. नावडकर म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, वीज, रस्ते, अग्निशमन पथक, आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी बारामती तालुक्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. पालखी स्वागताची तयारी चांगल्याप्रकारे करावी.

शुद्ध पिण्याच्या पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावे. त्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. रस्ता रुंदीकरणामध्ये गावाच्या पाट्या गेल्यामुळे पाट्या लावाव्यात. सोहळ्याच्या नियोजनाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक तहसील कार्यालयात द्यावेत. सर्व यंत्रणांनी पालखी सोहळ्याचे चांगल्यापद्धतीने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी मुख्याधिकारी श्री. रोकडे, गट विकास अधिकारी श्री. बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोमणे, पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी त्यांच्या विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाविषयीची माहिती दिली.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025

३६४ पोलिस निरीक्षकांची पदोन्नती फक्त २४ तासांत रद्द : पोलिस दलात खळबळ

प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस दलातील मोठ्या घडामोडीत ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांची (API) पोलिस निरीक्षक (PI) पदावर करण्यात आलेली पदोन्नती…

ByBymnewsmarathi Aug 23, 2025

आईवडील दगावले, दोन वर्षाचा चिमुकला बचावला…शिवशाही अपघातात जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू

प्रतिनिधी गोंदिया जिल्ह्यातील डव्वा येथे झालेल्या शिवशाही बसच्या भीषण अपघातात अनेकांनी आप्तस्वकीयांना गमावले आहे. या अपघातात भंडारा जिल्ह्यात…

ByBymnewsmarathi Nov 30, 2024

सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव… प्रशासनात महिलाराज

प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलावर्गाला खूश करण्यावर भर देणाऱ्या महायुती सरकारने यापूर्वी दोनदा डावललेल्या सुजाता सौनिक यांची राज्याच्या…

ByBymnewsmarathi Jul 1, 2024

महाराष्ट्र न्यूज 11 चा प्रथम वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजर

बारामती तालुक्यातील वानेवाडी येथे महाराष्ट्र न्यूज 11 चा पहिला वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा…

ByBymnewsmarathi Jun 26, 2024

पाकिस्तानला जाणारी आण्विक सामग्री जप्त; न्हावा शेवा सीमा शुल्क विभाग आणि सुरक्षा दलाची संयुक्त कारवाई; पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय कराराचा भंग

प्रतिनिधी चीनमार्गे पाकिस्तानला आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी जहाजातून पाठविण्यात येणारे संगणक न्युमेरिकल कंट्रोलचे साहित्य संयुक्त कारवाईत…

ByBymnewsmarathi Mar 3, 2024