अमरजीत सतीश लकडे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण.
प्रतिनिधी
सन 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक नगर रचनाकार अधिकारी श्रेणी एक महाराष्ट्र राज्यातून बाराव्या क्रमांकाने निंबुत गावचे सुपुत्र श्री अमरजीत सतीश लकडे यांची निवड झाली आहे.
अमरजीत यांचे शिक्षण बी ई सिविल झालेले असून. त्यांनी चार वेळा यूपीएससी सीडीएस पास होऊन इंटरव्यू दिलेला आहे एमपीएससी राज्यसेवा मेन्स मधून नुकतीच भूमी अभिलेख विभागात देखील त्यांची निवड झालेली आहे.

अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या अपयशांना न खचता त्यांनी जिद्द व चिकाटी अभ्यास व परिश्रमाच्या जोरावर आज ग्रेड वन ऑफिसर ची पोस्ट मिळवलेली आहे. त्यासाठीत्यांचे वडील मु.सा. काकडे महाविद्यालयाचे सचिव श्री सतीश लकडे. व त्यांचे आजोबा. कै मारुती लिंबाजी लकडे यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर निंबूत व परिसरातील युवकांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
