• Home
  • इतर
  • भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्ष पदी पत्रकार विनोद गोलांडे यांची निवड
Image

भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्ष पदी पत्रकार विनोद गोलांडे यांची निवड

प्रतिनिधी.

बारामती/सोमेश्वरनगर – भारतीय पत्रकार संघ (AIJ) बारामती तालुका यांची मासिक बैठक बारामती तील मुर्टि येथे रविवार दिनांक ४ रोजी पार पडली . मुर्टि बाजार तळ येथे भारतीय पत्रकार संघ जेष्ठ पत्रकार मोहम्मद शेख, निखिल नाटकर ,शरद भगत यांच्या वाढदिव व जागतिक पर्यावर औचित्य साधून मुर्टि बाजार तळ येथे उपसरपंच किरण जगदाळे व मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले तर पत्रकार शरद भगत यांनी वाढदिवसानिमित्त त्या वृक्ष ला संरक्षण म्हणून ट्री गार्ड स्व:खर्चानी बसवले तसेच मुर्टि ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नवनिर्वाचित बाळासाहेब जगदाळे यांची नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडी बद्दल व बारामती दूध संघाच्या संचालकपदी संतोष शिंदे यांचा सत्कार अध्यक्ष काशिनाथ पिंगळे व पत्रकार विनोद गोलांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला….मुर्टि येथील दहावीत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी सिद्धी बालगुडे ,श्रावणी मुकुंद कारंडे तसेच यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच किरण जगदाळे यांनी मुर्टि ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार संघाचे स्वागत केले व मनोगतात भारतीय पत्रकार संघ नाव हे तालुक्यात आदराने घेतले जाते व सर्व पत्रकार बंधू प्रमाणित काम करत असल्याचा उल्लेख आवर्जून केला तसेच उपसरपंच जगदाळे यांचा सत्कार सत्कार अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांनी केला तसेच कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनी श्रावण कारंडे यांनी महाराष्ट्र माझा हे काव्य सूंदर पद्धतीत सादर केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते छबान महादेव राजपुरे हरिदास जगदाळे उपस्थित होते

भारतीय पत्रकार संघ हा दर महिन्यातील मासिक बैठकीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यामुळे भारतीय पत्रकार संघाची एक तालुक्यात वेगळी ओळख आहे, तसेच या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या यासह अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारणी सर्वानुमते जाहिर करण्यात आली.तसेच सर्वानुमते पिंगळे यांनी अध्यक्ष पदाची धुरा विनोद गोलांडे यांच्या हाती सोपवत भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका कार्यकारिणी जाहीर केली ती खालील प्रमाणे
अध्यक्ष : विनोद दिलीप गोलांडे
उपाध्यक्ष : शंतनु सोपानराव साळवे
सचिव : सुशिलकुमार विलास अडागळे
सह सचिव : दत्तात्रय जाधव
कार्याध्यक्ष : माधव श्रीहरी झगडे
संघटक : महंमद मुसाभाई शेख
हल्ला कृती समिती : निखिल संतोष नाटकर
कोषाध्यक्ष : सोमनाथ जगन्नाथ जाधव
पदवीधर सल्लागार : संभाजी नारायण काकडे
प्रसिद्धी प्रमुख : अविनाश बाळासो बनसोडे
कायदेशीर सल्लागार : अॅड गणेश आळंदीकर
संघ प्रेस फोटोग्राफर : जितेंद्र चंद्रकांत काकडे
सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य तसेच माजी सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन व आभार.

पत्रकार बांधवांना एकत्र घेत संघ वाढ तसेच संघामार्फत विविध उपक्रम राबवत ,पत्रकार मित्रांना अडचणीच्या वेळेस न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न तसेच भारतीय पत्रकार संघाचे जिल्ह्यात स्थान एक वर आणण्याचा प्रयत्न करेन.

भारतीय पत्रकार संघ अध्यक्ष – विनोद गोलांडे

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025