श्री बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय, निंबुत येथे जागतिक पर्यावरण दिन’ उत्साहात साजरा…*

Uncategorized

प्रतिनिधी.
आपल्या आजूबाजूला असलेल्या पर्यावरणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तसेच पर्यावरणामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात, दि. ५जून २०२३ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी पर्यावरणाविषयी जनजागृती होण्यासाठी, आपले घर, अंगण, शाळा व सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना विविध देशी वनस्पतींचे बीज संकलन करण्याचे देखील आवाहन केले.


विद्यालयातील इ. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात स्वच्छता करून वृक्षारोपण केले आणि सीड बॉल बनवले.प्रगतीची वाट चोखाळताना पर्यावरण संवर्धनाचे भान ठेवूया, निसर्गाची अनमोल देणगी मनोभावे जपूया. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या उपक्रमाचे आयोजन विद्यालयातील उपशिक्षक श्री. सूर्यवंशी व्ही.एस यांनी केले.
या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्ष श्री. भिमराव केरबा बनसोडे सर, मानद सचिव श्री. मदनराव मोहनराव काकडे दे.यांनी केले.