प्रतिनिधी
पोलीस बांधव सुद्धा आपल्यासारखेच असतात त्यांना सुद्धा कुटुंब नातेवाईक तसेच नातीगोती असतात. परंतु त्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हां सर्वांच्या संरक्षणासाठी आपल्या कुटुंबाला वेळ न देता ते नेहमीच सण उत्सव धार्मिंक असे कार्यक्रम सोडून ते आपल्यासाठी नवरात्र गणपती उत्सव जयंती निमित्त रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे सर्वांनी पोलीस बांधवांशी प्रेमाने आपुलकीने स्वयंमी रहावे. आपण प्रवासात असाल, जर आपल्याला पोलीस बांधव निदर्शंनास आले तर त्यांना आदरांने नमस्कार किंवा जय हिंद सर अशा दोन शब्दाची तुमच्या मनातून शब्द फुटू द्या. बघा त्या पोलीस बांधवांना आपल्याबद्दल किती आदर आणि अभिमान वाटेल आणि आपण किती अडचणीत असला तर नक्कीच आपल्याला पोलीस बांधव सहकार्य करतील आता पालखी वारी साठी 22 दिसांची ड्युटी बंदोबस्त पोलिसांना लागला आहे. सर्व वारकऱ्यांनी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा चांगले सहकार्य करावे. पोलीस बांधव कर्तव्यावर असताना सुद्धा पालखी मार्गावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेषात आपल्याला दिसून येतात. कोणी वारकरी वेषात, तर कोणी वर्दीमध्ये पण खरंच पोलीस बांधवांना सुद्धा माऊलींच्या पालखीचा 22 दिवस बंदोबस लागणं हे त्यांच्यासाठी मोठं भाग्यच आहे. त्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी पोलीस बांधव सुद्धा वारीमध्ये दंग असल्यांचे नक्कीच दिसून येते._
पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तावर असणाऱ्या सर्व महाराष्ट्रांतील पोलीस बांधवांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा
संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी निमित्ताने पोलीस मित्र संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी चहा पाणी बिस्कीट यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे
तसेच पोलीस मित्र संघटनेतील पदाधिकारी आणि कमिटी सदस्य हे स्वयंसेवक म्हणून पोलीस खात्यातील कर्मचारी यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सहकार्य करत आहेत