• Home
  • माझा जिल्हा
  • पालखी सेवेसाठी सिल्वर ज्युबिली उपजिल्हा रूग्णालय सज्ज
Image

पालखी सेवेसाठी सिल्वर ज्युबिली उपजिल्हा रूग्णालय सज्ज

प्रतिनिधी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ जून रोजी बारामती शहरात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी सिल्वर ज्युबिली उपजिल्हा रूग्णालय सज्ज असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिली आहे.

पालखीदरम्यान वारकरी भाविकांची आरोग्य तपासणी, उपचार, तातडीच्या प्रसंगी विशेष उपचार आदी सेवा रुग्णालयामार्फत देण्यात येणार आहेत. परिसराची स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, हॉटेल व्यवसायिकंना मार्गदर्शन करणे, किटकशास्त्रीय सर्वेक्षण, धुर फवारणी बाबत करावयाची कार्यवाही आदींच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहेत.

शाहू माध्यमिक विद्यालय येथे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, स्टाफ नर्स व आरोग्य कर्मचारी यांचे पथक कार्यरत ठेवणे, पालखी तळावर रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी, परिचारिका २४ तास कार्यरत ठेवणे आदी सेवा देण्यासह उपजिल्हा रूग्णालय बारामती येथे माऊली आंतररुग्ण कक्ष पुरूष व महीला वारकऱ्यांसाठी कार्यरत राहणार आहे.

पालखी काळात वारकरी व भाविकांची आरोग्याबाबतीत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांशी समन्वयाने काम करण्यात येईल, असेही डॉ. जगताप म्हणाले.

Releated Posts

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026