• Home
  • इतर
  • पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करावयाच्या ठिकाणाची यादी जाहीर* *हरकती असल्यास नोंदविण्याची संधी*
Image

पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करावयाच्या ठिकाणाची यादी जाहीर* *हरकती असल्यास नोंदविण्याची संधी*

प्रतिनिधी.

बारामती, दि. ११: तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करावयाच्या ठिकाणाची यादी जाहीर करण्यात आली असून याबाबत हरकती असल्यास नागरिकांनी तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, इंदापूर मार्ग, बारामती या कार्यालयाकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गट विकास अधिकारी कार्यालयाने महाराष्ट्र भूजल अधिनियम १९९३, नियम १९९५ मधील नियमानुसार तालुक्यातील अंजनगाव, आंबी (बु), आंबी (खु), बऱ्हाणपुर, बाबुर्डी, चांदगुडेवाडी, चोपडज, भोंडवेवाडी, चौधरवाडी, डोर्लेवाडी, ढाकाळे, ढेकळवाडी, देऊळगाव रसाळ, दंडवाडी, धुमाळवाडी, गरदडवाडी, गुणवडी, गोजुबावी, गाडीखेल, घाडगेवाडी, होळ, जळगाव सुपे, जळगाव क.प., जळोची, जोगवडी, जराडवाडी, जैनकवाडी, कटफळ, कऱ्हावागज, कन्हेरी, करंजे, करंजे पुल, काळखैरेवाडी, काऱ्हाटी, कारखेल, काटेवाडी, कांबळेश्वर, कुरणेवाडी, कुतवळवाडी, कोळोली, कोऱ्हाळे बु., कोऱ्हाळे खु., खंडोबाची वाडी, खांडज, लाटे, लोणी भापकर, मळद, मगरवाडी (करंजे), माळेगाव बु., माळेगाव खु., माळवाडी (लोणी), माळवाडी (लाटे), मानप्पा वस्ती, मासाळवाडी, मुर्टी, मोराळवाडी, मुरुम, मुढाळे, मेडद, मोढवे, मोरगाव, नारोळी, निंबोडी, निरावागज, पणदरे, निबुंत, पवईमाळ, पळशी, पारवडी, पानसरेवाडी, पिंपळी, पाहुणेवाडी, रुई, सावळ, सांगवी, सायंबाचीवाडी, साबळेवाडी, शिर्सुफळ, शिरष्णे, शिरवली, सुपे, सोनवडी सुपे, सोरटेवाडी, सोनकसवाडी, सोनगाव, तरडोली, तांदुळवाडी, उंडवडी क.प., उंडवडी सुपे, वढाणे, वडगाव निंबाळकर, वंजारवाडी, वाणेवाडी, वाघाळवाडी, वाकी, झारगडवाडी, मोराळवाडी, उंबरओढा, खामगळवाडी या गावातील तसेच बारामती ग्रामीणमधील पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करावयाच्या ठिकाणाची यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यानी दिली आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025