सांगवी – पुणे एस टी बस पुनशः वाकी चोपडज मार्गे नागरिकांच्या सेवेत कार्यरत .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील पुण्याच्या दिशेने जाणारी सांगवी पुणे एस टी बस सेवा कोरोना काळात बंद करण्यात आली होती ती बस सेवा पुन्हा चालू करावी म्हणून वाकी, चोपडज ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते यांनी बारामती एसटी आगारकडे येथे निवेदन दिले होते. त्यांच्या या निवेदनाला व मागणीला यश मिळाले आहे .

अखेर लाल परी पुणे ते सांगवी चालू झाली यामध्ये सासवड, जेजुरी , कोळविहिरे, जोगवडी , मुर्टी, मोढवे,मोरळवाडी, कानाडवाडी ,वाकी ,चोपडज, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे , लाटे, शिरीषने ,कांबळेश्वर, सांगवी दिशेने धावणार आहे . तसेच ह्या एस टी चा टायमिंग पुणे येथून सांगवी साठी संध्याकाळी ४.३० मिनिटांनी तर सांगवी येथून पुणे साठी सकाळी ६ .३० मिनिटांनी सुटणार आहे. ही बस सेवा सुरळीत चालू केली आहे यामुळे ग्रामस्थ , वृध्द ,विद्यार्थी , महिला भगिनी यांना राहत मिळाली . एस टी सेवा बंद असल्यामुळे स्थानिक लोकांला पुणे साठी जायचे असेल तर खूप लांबून येडा मारून जावा लागत होते ह्यामुळे वृध्द , व विद्यार्थ्यांचा नुकसान होत असायचे . आज ही बस सेवा सुरू झाल्यामुळे वाकी , चोपडज ग्रामस्थांकडून एस टी ला सजवून चालक व कंडक्टर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामजिक कार्यकर्ते किसनराव जगताप , वाकी ,चोपडज सरपंच ,उपसरपंच ,सदस्य , ग्रामस्थ आदी उपस्थित होते .