- प्रतिनिधी – फिरोज भालदार
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त व मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमाच्या अंतर्गत वडगाव निंबाळकर बौद्ध विहार मरिमाता मंदिर येथे दि. १३/८/२०२३ रोजी मौर्य क्रांती महासंघ बारामती तालुका व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी केलेले होते .पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृतिदिनानिमत्त एकाच वेळी 36 जिल्ह्यात वृषारोपनाचा व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . त्याच्यावर चर्चा साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम वडगाव निंबाळकर या ठिकाणी मौर्य क्रांती महासंघ बारामती तालुका व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच सुनील ढोले यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .















