वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपी सह दोन मोटार सायकल हस्तगत 

क्राईम

प्रतिनिधी- फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीत दि. १७/०८/२०२३ रोजी रात्री ९:०० वा. ते सकाळी ९:३० वा चे सुमारास कारखेल ता. बारामती गावचे हददीत जगदंबा हॉटेलचे समोरील मोकळे पार्किंग मधुन काळे रंगाची हिरोहोंडा कंपनीची सी.डी.१०० मो.सा. नं. एम एच ४२ जे ७८०२ ही अज्ञात चोरटयाने चोरी केली गेली होती याच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचा तपास हा गोपणीय माहीती व तांत्रिक माहीतीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता किशोर सुरेश भापकर वय ३३ वर्षे रा. भापकरवस्ती कारखेल ता. बारामती जि. पुणे याने सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन, त्याने आणखी अशाच प्रकारचा वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ५३७ / २०२३ भादवि ३७९ हा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयाचे कामी आरोपीस अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरी गेलेल्या दोन मोटारसायकल असा एकुन ७५,०००/- रू किंमतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे.
१) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ५३६ / २०२३ भादवि ३७९
२) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ५३७ / २०२३ भादवि ३७९
सदरची कामगीरी अंकित गोयल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आनंत भोईटे सो अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग बारामती, गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सहफौजदार दत्तात्रय जाधव, भाऊसाहेब शेंडगे, पोहवा अनिल खेडकर, रूपेश साळुंखे, पोशि किसन ताडगे, पोपट नाळे, अमोल भुजबळ, कारखेल गावचे पोलीस पाटील सचिन जगताप, पोलीस मित्र अंकुश भोसले, पोलीस मित्र अजित नलवडे यांनी केलेली आहे.