सामाजिक बांधिलकी जपत न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी च्या विद्यार्थ्यांनी साजरे केले रक्षाबंधन.

Uncategorized

प्रतिनिधी.

न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी व भाग शाळा मुरूम येथील गाईडच्या विद्यार्थिनींनी उत्कर्ष आश्रम शाळा वाघळवाडी येथील विद्यार्थ्यांना व करंजेपूल पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवांना राखी बांधत सामाजिक बांधिलकी जपली. अशी आगळी वेगळी राखी पौर्णिमा साजरी करत असताना मुलींनी 125 मुलांना राख्या बांधल्या तर छोट्या भावांनी पेन, वही यासारखी गिफ्ट सुद्धा दिली. गाईड कॅप्टन प्राजक्ता यादव व सविता कांबळे यांनी मुलांसोबत खेळ व गाणी घेतली. याप्रसंगी उत्कर्ष शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सावंत, प्रभाकर कांबळे, सुभाष सावंत इ. उपस्थित होते. करंजी पूल पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवां सोबतही राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक शेलार साहेब यांनी मुलींना पोलीस स्टेशन बद्दल माहिती सांगितली तसेच काही तक्रार असल्यास निसंकोचपणे तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले. पोलिसांबद्दलची भीती कमी व्हावी आणि मुलांनी न घाबरता पोलिसांशी संवाद साधावा असे देखील श्री शेलार साहेब यांनी सांगितले सर्व मुलींना डेअरी मिल्क चॉकलेटस् देण्यात आले.तसेच पोलिस चौकीतील कॉन्स्टेबल श्री भोसले व श्री. नागटिळक यांना ही गाईड विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या या उपक्रमाला विदयालयाचे प्राचार्य संजय कांबळे यांनी परवानगी दिली तसेच असा हा आगळा वेगळा उपक्रमला साजरा करण्यासाठी स्काऊट मास्टर अशोक भोसले यांनी गाईड प्रोत्साहन दिले.