ज्योतिबा विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

Uncategorized

प्रतिनिधी.

28 वर्ष पूर्वी ज्योतिबा विकास सोसायटीची स्थापना करण्यात आली शेतकऱ्याला वेळेत शेतीसाठी पैसे उपलब्ध व्हावे या हेतून या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
आज मोठ्या प्रमाणात वेळ संस्थेकडून शेतकरी शेतीसाठी कर्ज उचलत आहे. आमचेही शासनाच्या ठरवून दिलेल्या व्याजदरात.
संस्थेची वार्षिक उलाढाल जवळपास पाच कोटीच्या घरात गेलेली आहे.
संस्था चांगल्या पद्धतीने सध्या नफ्यात आहे संस्थेचे अध्यक्ष यांनी यावेळी बोलताना सांगितले जवळपास इमारत निधी म्हणून संस्थेने आत्तापर्यंत 10/11लाख रुपये राखीव ठेवलेले आहेत लवकरच संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली जाईल.
संस्थेच्या नफ्यातून सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षांनी ज्यावेळी असे देखील सांगितले की सर्व सभासदांनी वेळेत कर्ज भरून संस्थेचा व आपला स्वतःचा फायदा करून घ्यावा जेणेकरून संस्था अडचणीत येणार नाही व दरवर्षी चांगल्या पद्धतीने लाभांश देता येईल