प्रतिनिधी.
निंबूत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात भारतीया फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार दि.१५/०९/२०२३रोजी फाउंडेशन च्या वतीने प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत इ.८वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचे एकूण चार गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटात तीन विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्य,देश,विज्ञान,जनरल नॉलेज, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रश्नांचा समावेश यामध्ये होता.
सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. यावेळी ज्युबिलंट भारतीया फाउंडेशनच्या ईती श्रीवास्तव, मारुती नंदन, रजनीश कुमार, प्रथम मदान, समरजीत सिंग, परमीत सिंग, प्रज्ञा कानडे व सायली फुंदे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी प्रेरणादायी मनोगते हिंदी भाषेतून मांडली. दिक्षा पोटे,सानिका बनसोडे व साहिल गोंडे यांच्या गटाचा प्रथम क्रमांक आला.
सूत्रसंचालन श्री.सुरेश येळे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी मानले. परीक्षक म्हणून श्री. विजय सूर्यवंशी सर यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री.कोळेकर सर यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे सर व मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.