प्रतिनिधी – फिरोज भालदार
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या व्यवस्थापन मंडळाला बारामती शिवसेना शिष्टमंडळाने दिला इशारा. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ यांच्याकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त प्रत्येकी सभासद यांना ३० किलो साखर वाटप केली जात होते .परंतु यावर्षी संचालक मंडळाने नवीन परिपत्रक काडल्यानुसार ३० किलो ऐवजी प्रत्येकी सभासदास १० किलो साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला.
यामुळें परिसरातील सभासद यांच्या मध्ये नाराजी पसरली आहे. यामध्ये सभासदांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडू होणार आहे . यामुळें शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश मदने यांच्या नेतृत्वात उप तालुका प्रमुख सुदाम गायकवाड, विभाग प्रमुख बंटी गायकवाड, वडगांव निंबाळकर चे शाखा प्रमुख नितीन गायकवाड, शिवसैनिक तानाजी गायकवाड, दिनकर कदम, विलास जाधव यांच्या उपस्थितीत सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी प्रत्येकी सभासद ३० किलो साखर वाटप पूर्ववत करावे.अन्यथा शिवसेना येत्या दीपावली पाढव्याला बोंबाबोंब आंदोलन करणार आहे असं पत्र,कारखान्याचे चेअरमन यांच्या नावे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास दिले आहे .
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हे दरवर्षीप्रमाणे दिवाळी ला ३० किलो साखर देणार का ? याची प्रतीक्षा पंचक्रोशीतिल सभासद करीत असताना चित्र दिसून येत आहे .