प्रतिनिधी – फिरोज भालदार
मोढवे ता. बारामती जि.पुणे या गावच्या हाद्दित तळ्याच्या पात्रामध्ये बेकायदेशीर विनापरवाना माती काडण्याचे काम चालू असता वडगाव निंबाळकर पोलिसांनी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करून मुद्देमाल केला जप्त .
दि. ७/११/२०२३ रोजी सायं ११ वा ४५ वाजनेच्या सुमारास जेसीबी चालक योगेश अरुण नागरगोजे रा . मोराळवाडी ता. बारामती जि. पुणे हे त्यांचे ताब्यातील एक पिवळे रंगाचा जेसीबी क्रमांक एम. एच. १५ डी .एल . ०६६९ चे सह्याने माती बेकायदा बिगरपरवाना मोढवे ता.बारामती जि.पुणे या गावचे हददीत तळ्याच्या पात्रातुन याचे ताब्यातील जेसीबी चे साहयाने उत्खनन करुन हायवा गाडी मध्ये माती भरत असताना मिळुन आले.
सदर ठिकाणावरुन मातीने भरलेली हायवा गाडी अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला आसून जेसीबी चालक व जेसीबी हा पोलिसांच्या हाती लागला आहे . यावरून पोलिस आमलदार पोपट बाळू नाळे यांनी योगेश अरुण नागरगोजे रा . मोराळवाडी ता . बारामती यांचे विरुद्ध फिर्याद दाखल करून भा. द. वि. कलम ३७९,पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कायदा कलम ५,१५,खान व खनिज अधिनियम १९५७ कायदा कलम ४,२१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
पुढील तपास वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पो.हवा नागटिळक हे करीत आहेत .