संपादक मधुकर बनसोडे.
माळेगाव पोलीस स्टेशन येथे 6/4/2023 रोजी अंदाजे सकाळी 11 वाजता अज्ञात इसमाने भारताचे संविधान पुस्तिका प्रत माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या प्रसाधनगृहाच्या दरवाजाच्या पाठीमागे ठेवून त्याचा व्हिडिओ बनवला त्याबद्दल माळेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 6:10:2023. रोजी
524/2023 भादवी कलम 295(अ ) सह राष्ट्र गौरवअवमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 नुसार गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास केला असता सदरचा गुन्हा संदीप आढाव यांनी केले चे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी केला.
मात्र पोलीस प्रशासनाकडून या गुन्ह्याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेल्याची स्थानिक नागरिकांमधून चर्चा होत आहे? नक्की काय आहे सत्य खरंच का पाळली गेली या गुन्ह्याबाबत गुप्तता यातून कोणाला वाचवण्याचा तर प्रयत्न होत नाही ना असे देखील नागरिकांमधून बोलले जात आहे?
आरोपी संदीप आढाव माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या प्रसाधन गृहामध्ये गेलाच कसा त्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये कोणी कर्मचारी नव्हते का? असतील तर त्याला आत मध्ये कोणाच्या परवानगीने जाऊन दिले.?जर संबंधित व्यक्तीने पोलीस स्टेशन मधून दुसरी काहीतरी वस्तू अथवा हत्यार घेऊन गेला असता व त्यातून काही घातपात झाला असता तर त्याची जबाबदारी नक्की कोणाकडे असते?
माळेगाव पोलीस स्टेशनची सुरक्षा ही रामभरोसेच आहे का असा देखील प्रश्न सामान्य नागरिकांमधून आता विचारला जात आहे.
संबंधित अधिकारी हे माळेगाव पोलीस स्टेशन सांभाळण्यासाठी खरंच सक्षम आहेत का?
संबंधित पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचारी यांची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी चर्चा दबक्या आवाजात स्थानिक नागरिकांमधून होत आहे.