मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 8 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 30 November 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत ग्रामसभा संपन्न ; सभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदी हनुमंत पानसरे यांची निवड .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 30, 2023 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत येथे महिला सभा व ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेमध्ये विकसित मुद्दे, विकसित कामकाज या विषयांवरती चर्चा करण्यात आली. ही ग्रामसभा वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच सुनील ढोले यांच्या अध्यक्ष्यतेखाली ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याचे प्रयत्न केले . यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभा सर्वांच्या शांततामय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .

ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली .यावेळी एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल झाले होते . यामध्ये अभिजीत साळवे,बापूराव दरेकर,सचिन गायकवाड,दत्तात्रय रांगोळे ,सुजित रणदिवे ,माया साळवे या सर्व अर्जदारांनी हनुमंत तुकाराम पानसरे यांना पाठिंबा देत बिनविरोध निवड करण्यात आली .

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी हनुमंत पानसरे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे गावाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य , व ग्रामस्थांकडून हनुमंत पानसरे यांना शुभेच्या देण्यात आल्या .
ग्रामसभेची मागील वर्षाची कार्यकारणी दत्तात्रेय चव्हाण यांनी मांडली . यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच , सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख