प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२३-२४ सुरू होवुन कारखान्याने ३५ दिवसांमध्ये जवळपास २ लाख ८० हजार मे.टन गाळप पुर्ण केलेले आहे. त्यातील गेटकेन उसाचे ९० हजार मे.टन गाळप केलेले असुन सभासदांच्या उसाचे १ लाख ९० हजार मे.टन गाळप केलेले आहे. तरी देखील सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल अद्यापपर्यंत जाहिर करून गाळप झालेल्या उसाचे पेमेंट सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग का केलेले नाहीत. वास्तविक उस गाळप झाल्या नंतर १४ दिवसांच्या आत FRP रक्कम देणे कायद्याने बंधनकारक असुन कारखान्याने अद्यापपर्यंत उस बिल दिलेले नसल्याने होणाऱ्या व्याजाची रक्कम ही कारखान्यास द्यावी लागणार आहे. तसेच कारखान्याने सभासदांच्या उस तोडीस प्राधान्य देणे गरजेचे असतानाही चेअरमन व संचालक मंडळ गेटकेनच्या अपरिपक्व कोवळ्या उसाचे गाळप करीत आहेत, असा उस गाळपास आला असताना शेतकरी कृती समितीने शेतकी अधिकारी यांना वेळोवेळी दाखवुन सदर उस परत माघारी पाठविला आहे. मग कशासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून विस्तारवाढ केली. चेअरमन यांच्या म्हणण्यानुसार १६ ते २२ लाख मे.टन उस कोठे गेला? तरी गेटकेन उसाची उसतोड ताबडतोब थांबवावी.
तरी यापुढे सभासदांच्या उस तोडीस आग्रकम देण्यात यावा. गेटकेन उसाला चेअरमन हे सभासदांच्या एवढाच देणार असल्याने त्याचा फायदा सभासदांना होणार नाही उलट सभासदांच्या उसाचे वजन घटत असुन गहु, ज्वारी सारखे भुसार पिक सुध्दा घेता येणार नाही. तसेच गेटकेनच्या उसाचे गाळप करून सभासदांचा उस दर वाढणार नाही शेतकरी कृती समिती गेटकेन उसास विरोध करीत नव्हती परंतु सभासदांच्या उस तोडी गेटकेन उसामुळे लांबल्याने सभासदांचे हित लक्षात घेता यापुढे गाळपास येणारा गेटकेन उस गाळपापासुन रोखला जाईल व याची संपुर्ण जबाबदारी चेअरमन व संचालक मंडळाची राहिल.
तरी दि.१०/१२/२०२३ अखेर पर्यंत कारखान्याने सभासदांच्या गाळप झालेल्या उसाचे पंधरवडा पेमेंट सभासदांच्या बँक खात्यात व्याजासह वर्ग करावे अन्यथा सोमवार दि.११/१२/२३ पासुन शेतकरी कृती समितीस कारखाना कार्यस्थळावर नाईलाजास्तव उपोषण करावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन व संचालक मंडळ यांची राहिल याची नोंद घ्यावी.
चेअरमन यांच्या म्हणण्याप्रमाणे कारखान्याची अर्थिक परिस्थिती चांगली आहे. छत्रपती साखर कारखाना भवानीनगर हा कारखाना आर्थिक आडचणीत असताना, भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याने, शरयु अॅग्रो या खाजगी साखर कारखान्याने, सुध्दा ३०००/- रू. प्रती मे.टन टना पेक्षा जास्त विनाकपात पहिली उचल जाहिर केलेली आहे. सोमेश्वर कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता शेतकरी कृती समितीने सर्व समावेशक ३३००/- रू. प्रती मे.टन पहिली उचल जाहिर करण्याची मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे कारखान्याने गाळप झालेल्या उसाचे पहिले बिल दि.१०/१२/२०२३ पर्यंत सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह वर्ग करावे. अन्यथा मा. साखर आयुक्त कार्यालयात दाद मागावी लागेल.
चेअरमन हे त्यांच्या कारकिर्दीत अंतिम दर जाहिर करताना संचालक मंडळात चर्चा न करता कुणालाही विश्वासात न घेता स्वतःला श्रेय मिळण्यासाठी जसे तत्पर असतात त्याच पध्दतीने पहिली उचल देण्यासाठी कोणत्या जोतिषाची वाट पाहत आहेत. का कारखाना आर्थिक आडचणीत आहे यावर बोलावे.