मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 8 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 06 December 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे ; संभाजी ब्रिगेडचे पारगाव खंडाळा एसटी डेपोस निवेदन .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
December 6, 2023 1 मिनिट वाचन 8,512 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

एसटी बसेस चांगल्या अवस्थेत प्रवाशांना उपलब्ध करून देण्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने पारगाव खंडाळा एसटी डेपो यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात संभाजी ब्रिगेडच्या वतीने असे म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील एसटी बसेस प्रवास करताना बंद अवस्थेत पडत आहेत . यामध्ये नागरिकांचे खूप हाल होत असतात. तसेच एसटी रात्री अपरात्री बंद पडत असतात .अशा घटना वारंवार घडत असताना दिसून येत आहे .यांचे दुरुस्तीकरण करणे वेळोवेळी गरजेचे आहे .काही ठिकाणी टायर पंचर झाल्यास स्टेफनी दुसरा टायर उपलब्ध नसतो तर काही ठिकाणी जॅक नसतो तर काही ठिकाणी बसेस ना खिडक्या देखील व्यवस्थित नसताना त्यांची गळतीही चालू असते .

प्रशासनाने शिवशाही उपलब्ध करून दिली असताना सुद्धा तिकिटाचे दर भरमसाठ देऊनही नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. तरी आपण विशेष निर्णय घेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आली आहे . अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा तीव्र इशारा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष मालुसरे , सुजित दगडे ,शौकत शेख , शाहिद हुसेन , वसीम शेख , सचिन जाधव , दीपक बाटे यांच्याकडून देण्यात आले आहे .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख