अवैद्य दारू विक्रेत्यावर जेजुरी पोलिसांची कारवाई.
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी –
दि .१२ डिसेंबर २०२३ रोजी १०.२० वाजण्याच्या सुमारास जेजुरी गावातील आनंदनगर ता.पुरंदर जि.पुणे या गावच्या हद्दीत म्हाळसकांत उर्फ चंड्या भीमराव भालेराव रा.आनंदनगर जेजुरी हा व्यक्ती आनंद नगर जेजुरी येथील समाज मंदिराचे समोर काटवानाच्या ठिकाणी गावठी हातभट्टीची तयार दारू काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये बाळगून लोकांना चोरून विक्री करीत होता .हे अवैध्य रित्या दारू विक्री करत असतानाचे दृश्य जेजुरी पोलिसांना आढळुन आले.
पोलिसांनी त्या व्यक्तीसाठी सापळा रचला मात्र त्या व्यक्तीला पोलिसांची चाहूल लागताच त्या अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने झाडाझुडपातून पळ काडला . त्याच्या विरोधात पोलिस नाईक गणेश मारुती नांदे यांनी महाराष्ट्र प्रोव्हिशन कायदा कलम ६५ ई प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे .
पुढील तपास पो हवा हाके हे करीत आहेत.
