प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालय येथे ६ जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त “भारतीय पत्रकार संघ” बारामती तालुक्याच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय वडगाव निंबाळकर येथे “पोलीस पत्रकार आरोग्य शिबिर” तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
साई सेवा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल च्या माध्यमातून सर्वच पोलीस पत्रकार व पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ यांची आरोग्य तपासणी उस्फूर्त प्रतिसाद मिळत त्यांची आरोग्य तपासणी करत भारतीय पत्रकार संघ च्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असल्याचे डॉ. शिंगटे सर्व डॉ. भिलारे यांनी बोलताना सांगितले तसेच आलेल्या मान्यवरांच्या वतीने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव निंबाळकर अंकित करंजे पुल दूरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे हे होते. त्यांनी सर्वच उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत ते नेहमीच आपल्या कर्तव्य व बातमीत बातमीदार तिथ तत्पर असतात व त्यांचे आर्य ही खूप मोलाचे असते असे बोलताना सांगितले तसेच साई सेवा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल चे डॉ.भिलारे यांनी पत्रकार दिनानिमित्त आम्हाला जी पत्रकार पोलीस व मान्यवर पदाधिकारी यांची आरोग्य तपासणीची संधी दिल्याबद्दल आभार मानत असेच या संघामार्फत उपक्रम राबवावेत तसेच पुढील काळात सर्व पत्रकार बंधूंची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल असेही त्यांनी बोलताना सांगितले .
नवनिर्वाचित बारामती राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष प्रियंका शेंडकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची संपूर्ण माहिती देत व त्या काळातील पत्रकारिता व आजची पत्रकारिता यामध्ये बदल असला तरी आजही पत्रकार बांधव एक समाजाचा खरा अर्थ आहे असे मानत त्यांच्या पत्रकारितेला सलाम करत पत्रकार बांधवांना आपले मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या .
तसेच व्यासपीठावर भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ, पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख तसेच बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे,ग्रामपंचायत उपसरपंच संगीता शहा, महिला दक्षता कमिटी सुचिता साळवे ,बारामती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस युवती अध्यक् प्रियंका शेंडकर, साई सेवा हॉस्पिटल चे डॉ भिलारे , डॉ शिंगटे हे होते .
या कार्यक्रम प्रसंगी आजी-माजी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर,उपाध्यक्ष भगवान माळशिकरे, पोपट हुंबरे,वडगाव निंबाळकर चे पोलीस निरीक्षक महेंद्र फनसे , हवालदार पन्हाळे ,नागटिळक साहेब, खेडकर साहेब, शेंडकर साहेब,देवकर साहेब व होमगार्ड स्टाफ तसेच , मराठी पत्रकार बारामती तालुका उपाध्यक्ष सुनील जाधव , महिला दक्षता कमिटी सुचिता साळवे , विशेष कार्यकारी अधिकारी व माजी सदस्य अनिता शैलंदर जाधव , तसेच शैलेंद्र जाधव सामाजिक कार्यकर्ते , सामाजिक नानासाहेब मदने अध्यक्ष जय मल्हार संघटना, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष बारामती तालुका प्रियंका शेंडकर,सविता सिपलकर महिला दक्षता समिती ,बांधकाम व्यावसायिक अवधूत महामुनी, ग्रामपंचायत सदस्य संजय साळवे, अजित भोसले, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक अध्यक्ष सुनील खोमणे , जाणता राजा युवा प्रतिष्ठान अध्यक्ष जितेंद्र पवार , ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता चव्हाण व कर्मचारी , तलाठी कर्मचारी शिवदत्त चव्हाण , हे उपस्थित होते.
याचबरोबर भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका सचिव सुशीलकुमार आडागळे ,संघटक मोहम्मद शेख , कार्याध्यक्ष माधव झगडे, सहसचिव बालगुडे ,सदस्य शौकत भाई ,सुभाष जेधे ,कदम साहेब, फिरोज भालदार , संतोष भोसले , चिंतामणी क्षीरसागर , ऋषिकेश जगताप ,सोमनाथ लोणकर ,दीपक जाधव , जितेंद्र काकडे ,अजय पिसाळ सह बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिंतामणी क्षीरसागरकर यांनी केले तर आभार भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे यांनी मानले