मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले

mnewsmarathi 28 Jan 2024 1 मिनिट वाचन 9,329 वाचन

प्रतिनिधी

खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बाॅयला कोयत्याच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निलेश पंडित गायकवाड (वय ३१, रा. स्वागत हाॅटेलसमोर, मांजरी बुद्रुक) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी करण, विशाल्या, मुज्ज्या, शुभ्या नावाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बाॅय आहे. या कंपनीकडून घरपोहोच खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येतात. हडपसर भागातील रामटेकडी परिसरात एका ग्राहकाला खाद्यपदार्थ देण्यासाठी निलेश गेला होता. रामटेकडीतील उर्दु शाळेजवळ अंधाऱ्या बोळात त्याला चौघांनी अडवले. त्याला कोयत्याचा धाक दाखविला. त्याच्याकडील दोन हजार रुपयांची रोकड, धनादेश पुस्तिका, तसेच अन्य साहित्य असा पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi