मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 09 February 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सोमेश्वरनगर मध्ये शिवसाई पतसंस्था शुभारंभ व कार्यालयाचे उद्घाटन समारंभ संपन्न*L

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 9, 2024 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

*सोमेश्वरनगर वाघळवाडी मध्ये शिवसाई पतसंस्था शुभारंभ व कार्यालय उद्घाटन समारंभ बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते पार पडला.*
*या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप होते. प्रमुख उपस्थितीमध्ये बारामती तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड कृष्णाई पतसंस्थेचे चेअरमन सुनील भोसले पतसंस्थेचे मार्गदर्शक व वाघळवाडी वि का सोसायटीचे चेअरमन सतीश सकुंडे उपस्थित होते*

*उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिवसाई पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तुषार सकुंडे व व्हा.चेअरमन समीर जाधव यांनी केले प्रथम पाच ठेवीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*

*शिवसाई पतसंस्थेचे संस्थापक/ चेअरमन तुषार सकुंडे यांनी संस्था स्थापन करण्यामागचे उद्दिष्टे असे आहे की सभासद ठेवीदारांचे हित जपणे असून समाजामध्ये सभासदांचे सामाजिक व आर्थिक प्रगती साधने व सदर प्रगती सहकाराच्या तत्त्वानुसार स्वतःसाठी व एकमेकांसाठी मदतीचे साधन आहे*

*या कार्यक्रमाला सोमेश्वर पंचक्रोशी मधील विविध गावचे आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य, इतर संस्थांचे पदाधिकारी वाघळवाडी चे ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसाई पतसंस्थेचे संचालक जालिंदर सावंत, आदिनाथ जगताप, गणेश चव्हाण, निखिल जगताप, सागर चव्हाण, अक्षय सावंत, प्रियांका सकुंडे, वर्षा सावंत सचिव व खजिनदार केदार सकुंडे उपस्थित होते*

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख