मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

नवले पूल परिसरात पुन्हा अपघात ; टँकरची सात ते आठ वाहनांना धडक

mnewsmarathi प्रतिनिधी
February 10, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात शनिवारी भरधाव टँकरने सात ते आठ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. बाह्यवळण मार्गावरून टँकर दुपारी चारच्या सुमारास निघाला होता. टँकरचालकाचे नियंत्रण सुटले. टँकरने एकापाठोपाठ सात ते आठ वाहनांना धडक दिली. अपघातात मोटारींचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजूला काढण्यात आली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अपघातात कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

बाह्यवळण मार्गावरील नवले पूल, भूमकर पूल परिसरात यापूर्वी गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत. नवले पूल परिसरात एकापाठोपाठ झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. बाह्यवळण मार्गावरील दरीपूल ते नवले पुलावर तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर मालवाहू वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघात घडतात.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा