• Home
  • क्राईम
  • बुधवार पेठेत वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून
Image

बुधवार पेठेत वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून

प्रतिनिधी

वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार पेठेतील क्रांती चौकात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक केली. नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख याला अटक करण्यात आली. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे. आरोपी कलाम शेख तिचा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी तिने नईम शेख याच्याशी विवाह केला होता. दोघेजण एकत्र राहत होते.

पत्नीने दुसरा विवाह केल्याने कलाम चिडला होता. तो नईमच्या पाळतीवर होता. बुधवार पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डींगजवळ शुक्रवारी सायंकाळी कलाम थांबला होता. काही वेळानंतर नईम तेथे आला. त्याने खिशातून वस्तरा काढला. नईमच्या गळ्यावर वस्तऱ्याने वार केला.

गंभीर जखमी झालेल्या नईमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कलाम घटनास्थळावरून पसार झाला. तो साथीदारासोबत पश्चिम बंगालला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला साथीदारासह रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026