• Home
  • क्राईम
  • वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील नामदेव महादेव लकडे यांचे मौजे गरदडवाडी ता. बारामती जि.पुणे येथील उसाचे शेतात आढळला एक पुरुष जातीचा बेवारस मृतदेह
Image

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील नामदेव महादेव लकडे यांचे मौजे गरदडवाडी ता. बारामती जि.पुणे येथील उसाचे शेतात आढळला एक पुरुष जातीचा बेवारस मृतदेह

प्रतिनिधी

 दिनांक ११/२/२०२४ रोजी सायंकाळी ५:३० वा. चे सुमारास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकीत कंरजेपुल पोलीस दुरक्षेत्र हददीतील शेतकरी नामदेव महादेव लकडे यांना त्यांचे मौजे गडदरवाडी ता. बारामती जि.पुणे येथील शेतजमीन गट नं ३९९ मधील उभे उस पिकाचे शेतात एक पुरुष जातीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचा मृतदेह दिसुन आल्याने त्यांनी त्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे दिले खबरीवरुन अकस्मात मयत रजि नं १०/२०२४ सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे मयत दाखल झाले असुन सदर मयताचा तपास वडगाव निबाळकर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन काळे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. पी.के. कन्हेरे हे करीत आहेत. सदरचा बेवारस मृतदेहाची ओळखपटे पर्यंत तो अॅम्ब्युलन्सने सिल्व्हर ज्युबली हॉस्पीटल बारामती येथे पाठवुन फिजरमध्ये ठेवण्यात आलेला आहे.

सदरचे बेवारस पुरुष मयताचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचे असुन त्याचे चेहरा काळपट असुन, डोकीस काळे पांढरे केस आहेत, तसेच गालावर पांढरी दाढी असुन, शरीर सडपातळ आहे. त्याचे अंगात नेसणीस एक राखाडी रंगाची बरमोडा आहे.तरी वडगाव निबाळकर पोलीसांकडुन सदर मयताचे ओळख पटविणेकामी आवाहण करण्यात येते की, वरील वर्णनाचे, सोबतचे फोटोमधील बेवारस मयतास कोण ओळखत असल्यास वडगाव निबाळकर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. कन्हेरे मो.नं.९४२००१६३८९ यावर तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन फोन कमांक ०२११२/२७२१३३ यावर संपर्क होणेस विनंती आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026