• Home
  • क्राईम
  • साकीनाका हत्या प्रकरणातील आरोपींना सहा तासांत अटक
Image

साकीनाका हत्या प्रकरणातील आरोपींना सहा तासांत अटक

प्रतिनिधी

दुचाकीचा धक्का लागल्यामुळे जाब विचारला असता तिघांनी २२ वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना साकीनाका येथे घडली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी तपास करून सहा तासांत आरोपींना अटक केली. तिघे एकाच दुचाकीवरून प्रवास करीत होते.

मोहम्मद सुहेब ऊर्फ शोहेब सुहेबुद्दीन इमामुद्दीन अन्सारी (२२) हा जरीकाम करणारा कामगार होता. तो साकीनाका येथील खैराणी रोड येथून रविवारी दुपारी चालत जात होता. त्यावेळी एस. जे. स्टुडिओ समोर त्याला एका दुचाकीचा धक्का लागला. त्यावेळी अन्सारी त्यांना ओरडला असता आरोपींनी दुचाकी थांबवली. त्यानंतर दुचाकीवरील तिघे खाली उतरले व त्यांनी अन्सारीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. या वादानंतर तिघांनी अन्सारीला मारहाण केली.

आरोपींनी पेव्हरब्लॉकने अन्सारीला मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे अन्सारी खाली कोसळला. त्यानंतर पादचाऱ्यांनी अन्सारीला साकीनाका येथील पॅरामाऊंट रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अन्सारीला मृत घोषित केले. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रत्यक्षदर्शींकडून घटनेची माहिती घेतली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या आरोपींच्या वर्णनावरून गोवंडी शिवाजी नगर येथून तिघांना ताब्यात घेण्यात आले. अनस शेख (२१), गुल्फराज खान (२३) व अफजल सय्यद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच अन्सारीला मारहाण केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात तिघांनाही अटक केली.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026