मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 5 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना बेड्या

mnewsmarathi 12 Feb 2024 1 मिनिट वाचन 8,918 वाचन

प्रतिनिधी

सोन्याच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. मात्र दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. घाटकोपर पोलिसांकडून शुक्रवारी रात्री परिसरात गस्त सुरू होती. यावेळी परिसरात जवाहिराच्या मोनालीसा ज्वलर्स या दुकानाबाहेर पोलिसांना काहीजण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी यापैकी तिघांना ताब्यात घेतले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी पोबारा केला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याजवळ दरोडा घालण्यासाठी लागणारी हत्यारे सापडली असून पोलिसांनी ती जप्त केली. राजेश कदम (३८), महावीर कुमावत (३६) आणि हापुराम राज पुरोहित (२२) अशी या आरोपींची नावे असून तिघेही ठाणे परिसरातील रहिवासी आहेत. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात राज्यभरात २० ते २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi