मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची प्रवासी बसला धडक, अपघातात सात प्रवासी जखमी

mnewsmarathi 16 Feb 2024 1 मिनिट वाचन 8,737 वाचन

प्रतिनिधी

मुंबई – बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला. मुंबईकडून वेगाने निघालेल्या डंपरने प्रवासी बसला धडक दिली. अपघातात सात प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास अपघात झाला.

नवले पुलाजवळ व्हीआरएल ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीची बस प्रवाशांना घेऊन सकाळी सात सुमारास कार्यालयाच्या आवारातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर येत होती. त्यावेळी मुंबईकडून वेगाने आलेल्या डंपरचालकाला बस दिसली नाही. डंपर चालकाने बसला चुकविण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगात असलेल्या डंपरने बसच्या उजव्या बाजूला पाठीमागून धडक दिली. अपघातात बस आणि डंपरचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातात सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi