मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 25 February 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

वंचित बहुजन आघाडी बारामती तालुका अध्यक्ष रामदास जगताप यांची विस्तारीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त ….

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 25, 2024 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

 प्रतिनिधी.
वंचित बहुजन आघाडीच्या बारामती तालुका विस्तारित कार्यकारणी मध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे
पुणे येथे नुकत्याच झालेल्या पक्ष संघटनेच्या  मुलाखती मध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व जिल्हा अध्यक्ष राज यशवंत कुमार यांच्या आदेशान्वये रामदास जगताप यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या बारामती तालुका विस्तारित कार्यकारणी मध्ये पुढीप्रमाणे निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी शशिकांत बनसोडे व मच्छिंद्र कडाळे तर महासचिव पदी रविंद्र गायकवाड व सचिव पदी तौफिक सय्यद,सचिन काळे, राजेंद्र भोसले, सचिन काकडे संघटक पदी सतिश लोंढे यांची निवड करून तालुका विस्तारीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर
जगताप म्हणाले इंथून पुढे पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच गाव तेथे शाखा उपक्रम राबवून ग्रामीण भागापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहचवणे, तसेच आगामी निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जाण्याकरिता
आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी नवनिर्वाचित पदािकाऱ्यांनचा जिल्हा संपर्क प्रमुख वैभव कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख