• Home
  • क्राईम
  • चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताची पोलीस कोठडीत आत्महत्या
Image

चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताची पोलीस कोठडीत आत्महत्या

प्रतिनिधी

चोरीच्या गुन्ह्यात जळगाव जिल्ह्यातील मारवड येथील पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताने अमळनेर येथील पोलीस ठाण्यातील कोठडीत (लॉकअप) गळफास घेतल्याचे शनिवारी उघड झाले.

अमळनेर तालुक्यातील मारवड येथील पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी बकरी चोरीच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयित घनश्याम कुमावत (४९, मूळ रा. दोंदवाडे, चोपडा, हल्ली मुक्काम डांगरी, अमळनेर) याला दोन मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर तपासात बकरी चोरी प्रकरणात सहभागही दिसून आला. गुन्ह्यात संशयित कुमावतला अमळनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने त्याला सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला मारवड येथील पोलीस ठाण्यातील २९ फेब्रुवारीच्या तार चोरी प्रकरणात दाखल गुन्ह्यात न्यायालयाने नऊ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी संशयिताला वर्ग केले होते. अमळनेर येथील पोलीस ठाण्यातील कोठडीत असताना शनिवारी सकाळी संशयित शौचाला गेला. शौचालयात संशयिताने चादर फाडत गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही संशयित शौचालयाबाहेर येत नसल्याने सुरक्षारक्षकाने पाहणी केली असता संशयिताने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडून प्रशासन कामाला लागले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अपर अधीक्षिका कविता नेरकर यांच्यासह अधिकार्‍यांनी अमळनेर येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत कळू शकलेले नाही.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026