मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 16 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

विशेष कार्यकारी अधिकारीपदी सुखदेवराव शिंदे यांची नियुक्ती; सोमेश्वर पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण!

mnewsmarathi 16 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,956 वाचन

प्रतिनिधी

बारामती तालुक्यात ४१ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; चौधरीवाडी-करंजे गावाच्या वतीने सुखदेवराव शिंदे यांना मानाचा बहुमान!

बारामती तालुक्यात शासनाच्या वतीने ४१ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, यामध्ये सोमेश्वर पंचक्रोशीतील चौधरीवाडी (करंजे) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुखदेवराव पोपट शिंदे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि जनसेवेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत, सदैव समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुखदेवराव शिंदे यांची पंचक्रोशीत ओळख आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्यसेवा, गरजू लोकांना मदत, शैक्षणिक उपक्रम आणि विविध सामाजिक कार्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत शासनाने त्यांच्यावर विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. ही नियुक्ती केवळ सुखदेवराव शिंदे यांचा सन्मान नसून संपूर्ण चौधरीवाडी आणि सोमेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानाची बाब आहे.

या नियुक्तीबद्दल सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच सुखदेवराव शिंदे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

जनसेवेचा प्रवास असाच अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा!

लेखक

mnewsmarathi

M News Marathi