मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 11 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

लक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास

mnewsmarathi 11 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,595 वाचन

प्रतिनिधी

दिवाळीच्या सणात घराघरांत आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना पुण्यातील हडपसर परिसरात धक्कादायक घरफोडीची घटना घडली आहे. लक्ष्मीपूजन करून घरातील सर्वजण झोपले असताना चोरट्यांनी एका बंगल्याला लक्ष्य केले.देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल 48 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयासमोर असलेल्या नेताजी सुभाष गृहरचना सोसायटीमध्ये ही घटना घडली. 9 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्यात चोरी केली. त्यावेळी घरातील सर्व सदस्य लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आटोपून झोपले होतेचोरट्यांनी बंगल्याच्या देवघराच्या खिडकीची काच बाजूला करून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तूंचा शोध घेत सोन्याचे दागिने आणि 12 लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. या सर्व वस्तूंची एकूण किंमत सुमारे 48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळी घरातील सदस्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला. याप्रकरणी अजित रामचंद्र वाडेकर (वय 49, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहेलक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास..

लेखक

mnewsmarathi

M News Marathi