• Home
  • माझा जिल्हा
  • वडगाव निंबाळकर येथे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्या वतीने जामा मज्जिद येथे इफ्त्यार  पार्टीचे आयोजन 
Image

वडगाव निंबाळकर येथे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्या वतीने जामा मज्जिद येथे इफ्त्यार  पार्टीचे आयोजन 

प्रतिनिधी – फिरोज भालदार

मुस्लिम धर्माचा पवित्र महिना म्हनजे रमजान ओळखला जातो यामध्ये सर्व मुस्लिम बांधव तीस दिवसासाठी उपवास धरून नमाज पठण करत असतात . याचेच औचित्य साधून जामा मस्जिद वडगाव निंबाळकर येथे सोळा रमजान ला वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी IPS दर्शन दुग्गड अधिकारी सह पोलिस निरीक्षक API सचिन काळे व याचबरोबर त्यांच्या स्टाफचे पोलीस हवालदार महेश पन्हाळे ,पोलीस हवालदार तोफीक मानेरी ,अमोल भुजबळ, ज्ञानेश्वर करे ,रणजित देशमुख यांनी सर्व मुस्लिम बांधवांबरोबर रोजा इफ्तार केला. यावेळी प्रभारी अधिकारी IPS दर्शन दुग्गड व API सचिन काळे यांच्याकडून सर्व मुस्लिम बांधव यांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यात आले .

यावेळी आहील अत्तार याने कमी वयात रमाजन महिन्याच्या उपवास धरला होता IPS दर्शन दुग्गड व API सचिन काळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला . यावेळी अध्यक्ष मुन्ना बागवान, आजीम इनामदार, चिंतामणी क्षीरसागर , तोफिक बागवान, इरफान बागवान, रिजवान पठाण, जावेद बागवान, सलमान आत्तार, शाहिद बागवान, शब्बीर भाई कोरबू, शिकंदर भालदार, हे उपस्थित होते. इफ्तार पार्टीचे सूत्रसंचालन शाहबुद्दिन मनेर सर यांनी केले तर आभार अजीम इनामदार यांनी मानले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026