मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 6 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

mnewsmarathi 01 Apr 2024 1 मिनिट वाचन 8,970 वाचन

प्रतिनिधी

एका तरुणाने वस्तीतच राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गेल्या नऊ महिन्यांपासून मुलीचे लैंगिक शोषण सुरु होते. कुटुंबीयांना याबाबत कळल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तरुणाला अटक केली. ही घटना कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. कृष्णा झनकलाल मच्छिरके (२६) रा. कोराडी, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

जून २०२३ मध्ये १५ वर्षीय मुलीला कृष्णाने ओळखी करीत मैत्री करून घेतली. वस्तीतच राहणाऱ्या मुलीच्या घराकडे वारंवार चकरा मारून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. घरी एकटा असताना त्याने मुलीला भेटण्यासाठी बोलावले. तेथे तिच्याशी अश्लील चाळे सुरू केले. तिने विरोध केला असता लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो सतत मुलीचे लैंगिक शोषण करीत होता. दरम्यान मुलीच्या कुटुंबीयांना दोघांच्या संबंधाबाबत कळले. चौकशीत कृष्णाने बैगिक अत्याचार केल्याचे समोर आले. मुलीसह पोलीस स्टेशन गाठून कृष्णा विरुद्ध तक्रार करण्यात आली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून कृष्णाला अटक केली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi