संपादक- मधुकर बनसोडे
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे या कारखान्याचा सन २०२२-२३ चा गाळप हंगाम सुरू होवुन सव्वा महिना झालेला आहे. आजपर्यंत कारखान्याने २ लाख ८१ हजार मे. टन गाळप केलेले असुन आज कारखान्याकडे ३ लाख ९० हजार साखर पोती उपलब्ध आहेत आज साखरेचे दर ३८००/- ते ४०००/- रू प्रति क्विंटल आहेत. यानुसार कारखान्याकडे सुमारे १५० कोटी रूपये उपलबध होतात. तरीही सभासदांची सुमारे ८२ कोटी F.R.P रक्कम कारखाना देवु शकत नाही. ही रककम कारखाना बिनव्याजी वापरत आहे. कायद्या प्रमाणे गाळप झालेल्या उसाला १४ दिवसात F.R.P रक्कम पुर्ण देणे बंधनकारक आहे. परंतु मागील राज्य शासनाने दोन टप्यांमध्ये F.R.P रक्कम देण्याबाबत केंद्रास शिफारस केलेली होती परंतु केंद्राने याबाबत अध्यादेश न काढल्याने सोमेश्वर कारखान्यासह राज्यातील इतर कारखान्यांनी देखील पूर्ण F.R.P रक्कम देण्यास टाळाटाळ चालविली होते. कोल्हापूर व सांगली जिल्हयातील कारखान्यांनी एकरककमी F.R.P पुर्वीप्रमाणे दिली परंतु सोमेश्वर कारखान्याने आजपर्यंत का F.R.P दिली नाही? कारखान्यास सभासदांचे बिनव्याजी पैसे वापरायचे होते का? परवा राज्य सरकारने F. R.P एक रक्कमी देण्याचे धोरण जाहीर केले आहे तरी कारखान्याने आपल्या कारखान्याच्या चांगल्या आर्थिक परिस्थिती नुसार एकरक्कमी F. R.P २९०० /- प्र.मे. टन दि. १० डिसेंबर अखेर सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह वर्ग करण्यात यावी अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.सोमेश्वर कारखान्याने मागील ३ ते ४ वर्षात उच्चांकी भाव दिला आहे. तसेच चेअरमन कारखान्यावर कोणत्याही प्रकारचे थकीत कर्ज नाहीत नियमित कर्जे आहेत असे वारंवार सांगत आहेत. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कारखान्याने १३ लाख २५ हजार ३९५ मे.टन ऐवढे उच्चांकी गाळप करून १५ लाख ५४ हजार ६२५ साखर पोत्यांचे उत्पादन झालेले होते. त्यामुळे कारखान्यास मागील वर्षी साखर विकी, को-जन व उपपदार्थ निर्मिती मधुन जादाचे उत्पन्न मिळालेले आहे. कारखान्याची नेट F.R.P २९०० /- रु. प्रति मे.टन होत असुन सदर रक्कम एकरक्कमी सभासदांना मिळाल्यास सभासदांची सोसायट्यांची कर्ज एकरक्कमी भरता येतील व त्यामुळे जिल्हा बँकेच्या बिनव्याजी कर्जाचा त्यांना फायदा घेता येईल तसेच एकरक्कमी F.R.P रक्कमेमुळे वैयक्तिक कामे सभासदांना पुर्ण करता येतील. शाळा सुरू झाल्याने दुसऱ्या टप्यातील फी, शेतीच्या मशागती, उसाची बांधणी, बी-बियाणे खरेदी व लग्न सराई अशा अनेक गोष्टींना सभासदांना सामोरे जावे लागणार असल्याने त्यांना पैशांची आवश्यकता आहे.तसेच चालु वर्षी सन २०२२-२३ या गाळप हंगामात कारखाना जादा गाळप क्षमतेने गाळप करणार असुन साखरेचे, को-जन, उपपदार्थाचे जादा उत्पादन होणार आहे. सध्या साखरेचे दर ४००० रू. क्विंटल चे वर आहेत. तसेच उपपदार्थाच्या दरामध्ये केंद्रसरकारने सरासरी १० ते १५ टक्के वाढ केलेली आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती चेअरमन यांच्या म्हणण्याप्रमाणे भक्कम असल्याने मग कारखान्यास एकरक्कमी २९००/- रू. प्रति मे.टन FRP व त्यावरील व्याज देण्यास काही अडचण येण्याचे कारणच नाही. तरी चेअरमन व संचालक मंडळाने एकरक्कमी FRP रक्कम दि. १० डिसेंबर अखेर सभासदांच्या बँक खात्यावर १५ टक्के व्याजासह वर्ग करण्यात यावी अन्यथा नाईलाजास्तव शेतकरी कृती समितीस कारखान्याचा काटा बंद करावा लागेल. व याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन व संचालक मंडळाची राहील.
आपल्या कारखान्यास चालू हंगामात सभासदांचा उस जादा आहे तोडणी वाहतुक यंत्रणा उशीरा आली कारखान्याची गाळपाची घडी बसली नव्हती. याची कृती समितीने जाणीव ठेवून सव्वा महिना सहकार्यांची भुमीका ठेवलेली आहे. व भविष्यातही कारखान्याच्या संचालक मंडळास सहकार्यांची भुमिका राहणार आहे. परंतु कारखाना जर सभासदांचे हिताचे निर्णय घेत नसेल तर मात्र कृती समितीस वेगळा विचार करावा लागेल याची नोंद घ्यावी.