मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 1 September 2026

युवकांच्या सतर्कतेमुळे निंबूत येथे चोरांनी धूम स्टाईलने काढला पळ.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 13, 2024 1 मिनिट वाचन 8,509 वाचन

.

संपादक मधुकर बनसोडे.

नींबूत येथे आज दुपारी अंदाजे दोन वाजण्याच्या दरम्यान युनिकॉन गाडीवरती तीन युवक तोंडाला रुमाल बांधून आल्याचे काही युवकांच्या निदर्शनास आल्यानंतर नींबूत येथील युवकांनी त्या युनिकॉन वरील तिघांचा पाठलाग केला.
शिरसाई वस्ती येथे गेल्यानंतर बाईक स्वार हे चोर आहेत हे लक्षात आल्यानंतर निंबूत येतील युवकांनी त्यांना दगडी मारण्यास सुरुवात केली दगडी मारत असताना बाईक सर गाडीवरून खाली पडले. त्यानंतर त्यातील एक जणांनी धारदार हत्यार काढून युवकांना जखमी करण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणाहून बाईक वरील तिन्ही चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन काळेसाहेब, कनेरी साहेब, व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन युवकांना फेकून मारण्यात आलेली काही हत्यारी ताब्यात घेऊन सदर बाईक स्वरांचा तपास परिसरामध्ये करीत आहेत.
काळेसाहेब यांनी युवकांना आवाहन केले की अशी संशयस्पद कोणतीही व्यक्ती आपल्या गावात अथवा परिसरात निदर्शनास आल्यास त्वरित पोलीस प्रशासनास कळवावे नींबूत येथील युवकांच्या धाडसाचे कौतुक यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख